समाजसुधारक आणि त्यांचे कार्य

महाराष्ट्रातील ११ समाजसुधारक
महाराष्ट्रातील समाजसुधारक

महाराष्ट्रातील ११ समाजसुधारक आणि त्यांचे कार्य

महाराष्ट्राला समाजसुधारकांची मोठी परंपरा लाभली आहे. जातिभेद, अस्पृश्यता, स्त्रियांना शिक्षणाची बंदी, बालविवाह आणि विधवांचे हाल अशा अन्यायकारक प्रथांविरुद्ध या सुधारकांनी आयुष्यभर काम केले. शिक्षणाचा प्रसार, स्त्री शिक्षण, सामाजिक समानता आणि वंचितांचे हक्क ही त्यांच्या कार्याची मुख्य सूत्रे होती.

या लेखात ११ प्रमुख समाजसुधारकांचा जन्म, संस्था, ग्रंथ, वृत्तपत्रे, उपाधी आणि निधन ही परीक्षेत विचारली जाणारी माहिती सोप्या भाषेत दिली आहे. शिष्यवृत्ती आणि स्पर्धा परीक्षांसाठी हा लेख उपयुक्त आहे. शेवटी एका नजरेतील तक्ता आणि सराव प्रश्नही दिले आहेत.

महात्मा ज्योतिबा फुले

  • पूर्ण नाव: ज्योतिराव गोविंदराव फुले. आधुनिक भारताच्या सामाजिक क्रांतीचे जनक मानले जातात.
  • जन्म-11 एप्रिल 1827 कटगुण,जि. सातारा
  • विवाह-सन 1840 मध्ये सावित्रीबाईशी  
  • 1848 पुण्यातील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली.
  • 1863: बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना; विधवा विवाहाला प्रोत्साहन.
  • 24 सप्टेंबर 1873: सामाजिक पुनर्रचनेसाठी सत्यशोधक समाजाची स्थापना.
  • वेद,ब्राम्हण्य,मनुस्मृती यांना कडाडून विरोध केला. 
  • 11 मे 1888 मुंबईतील कोळीवाडा येथे जनतेकडून महात्मा ही पदवी प्रदान. 
  • महात्मा ज्योतिराव फुले यांना महाराष्ट्राचे “मार्टिन ल्युथर किंग” म्हणून ओळखले जातात.
  • ग्रंथ: तृतीय रत्न (नाटक), शिवाजीचा पोवाडा, ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी (1873), शेतकऱ्याचा आसूड (1883), अस्पृश्यांची कैफियत, इशारा, अखंड, सार्वजनिक सत्यधर्म (मरणोत्तर).
  • सत्यशोधक चळवळीतील सहकारी नारायण मेघाजी लोखंडे यांनी 1890 मध्ये बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन स्थापन केली. ती भारतातील पहिल्या कामगार संघटनांपैकी मानली जाते.
  • 28 नोव्हेंबर 1890 पुणे येथे निधन.

सावित्रीबाई फुले

  • जन्म: 3 जानेवारी 1831, नायगाव (ता. खंडाळा, जि. सातारा).
  • 1840-ज्योतीरावांशी विवाह.यांच्या प्रेरणेने शिक्षणाला सुरुवात.
  • 01.01.1848-ज्योतिरावांनी सुरू केलेल्या मुळीसाठीच्या पहिल्या शाळेच्या पहिल्या महिला शिक्षीका व पहिल्या मुख्याध्यापिका.
  • 1893-सासवड पुणे येथे भरलेल्या सत्यशोधक समाजाच्या अधिवेशनाच्या अध्यक्षा .
  • 10 मार्च 1897: पुण्यात प्लेगच्या साथीत रुग्णांची सेवा करताना प्लेगची लागण होऊन निधन.
  • काव्यसंग्रह: काव्यफुले (1854), बावनकशी सुबोध रत्नाकर (1892).

राजर्षी शाहू महाराज

  • मूळ नाव यशवंत जयसिंगराव घाडगे. जन्म 26.06.1874 कागल (जि. कोल्हापूर).
  • 2 एप्रिल 1894 त्यांनी कोल्हापूरचे अधिपती म्हणून पदभार स्वीकारला. 
  • कोल्हापूर संस्थानचे राजे चौथे शिवाजी यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी आनंदीबाई यांनी यशवंत यांना 17 मार्च 1884 साली दत्तक म्हणून स्वीकारले.शाहू असे नाव ठेवण्यात आले. 
  • 26 जुलै 1902: कोल्हापूर संस्थानात मागास जातींना 50 टक्के आरक्षण जाहीर केले. म्हणून “आरक्षणाचे जनक” म्हटले जाते.
  • 1912-प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारा कायदा केला.या कायद्याद्वारे प्रत्येक लहान मुलाला शिक्षण घेणे सक्तीचे होते. 
  • 1916-डेक्कन रयत असोसिएशन या संस्थेची स्थापना.
  • 1917-विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा.
  • 1818-आंतरजातीय विवाहास कायदेशीर मान्यता देणारा कायदा.
  • 1919-सवर्ण व अस्पृश्य यांच्यासाठी वेगवेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली. 
  • 1919: कानपूर येथे कुर्मी समाजाने “राजर्षी” ही पदवी दिली.
  • 1920: माणगाव परिषदेत डॉ. आंबेडकर भविष्यात दलितांचे नेते होतील असे उद्गार काढले. आंबेडकरांना उच्च शिक्षणासाठी मदत केली.
  • सर्व समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावे म्हणून 26 वेगवेगळ्या जातीच्या वस्तीगृहाची निर्मिती केली.
  • अनेक ठिकानी अस्पृश्यता परिषद घेऊन अस्पृश्यता निर्मूलनाचे कार्य केले.
  • कोल्हापूर संस्थानात संगीत,चित्रपट, चित्रकला,लोक कला,कुस्ती,वन्यजीव संरक्षण,शेती,कारखाने,धरण बांधकाम अशा अनेक क्षेत्रात भरीव काम केले. 
  • भारतातील सामाजिक क्रांतीचे प्रणेते आणि महान समाजसुधारक म्हणून ओळखले जातात. 
  • 6 मे 1922 साली मुंबई येथे निधन झाले . 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महान समाज सुधारक,भारताचे घटनाकार,अर्थशास्त्रज्ञ,समाजशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ होते.
  • पूर्ण नाव–डॉ.भीमराव रामजी आंबेडकर
  • जन्म-14 एप्रिल 1891 महू गाव मध्य प्रदेश
  • शिक्षण-एम.ए,पी.एचडी,एम.एस्सी, डी.एससी, बार ॲट लॉ या पदव्या बाबासाहेबांनी संपादित केल्या. 
  • 7 नोव्हेंबर 1900: सातारा येथील सरकारी शाळेत प्रवेश (हा दिवस “विद्यार्थी दिवस” म्हणून साजरा होतो).
  • 1904-चौथी पास होऊन एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये प्रवेश घेण्यात आला. 
  • 1907: मॅट्रिक उत्तीर्ण. 1908: एल्फिन्स्टन कॉलेजात प्रवेश. 
  • 1912: मुंबई विद्यापीठातून बी.ए. (राज्यशास्त्र व अर्थशास्त्र).. 
  • 1913: उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला. सयाजीराव गायकवाड यांची आर्थिक मदत.
  • 1915: कोलंबिया विद्यापीठातून एम.ए. प्रबंधाचा विषय “प्राचीन भारतीय व्यापार”.
  • 1916: लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्रवेश.
  • 1917: “भारताचा राष्ट्रीय लाभांश” हा प्रबंध सादर. कोलंबियाची पीएच.डी. पदवी 1927 मध्ये प्रदान. 
  • 1921: लंडनमधून एम.एस्सी. 1923: डी.एस्सी. आणि बॅरिस्टर.

सामाजिक आणि राजकीय कार्य

  • 31 जानेवारी 1920: “मूकनायक” पाक्षिक सुरू.
  • 5 जुलै 1923: मुंबई उच्च न्यायालयात वकिली सुरू. 
  • 20 जुलै 1924: बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना.
  • 20 मार्च 1927: महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह.
  • 3 एप्रिल 1927: “बहिष्कृत भारत” पाक्षिक सुरू.
  • 25 डिसेंबर 1927: महाड येथे मनुस्मृतीचे दहन..
  • 03.मार्च 1930-नाशिक येथील काळाराम मंदिराचा सत्याग्रह
  • 24 सप्टेंबर 1932: पुणे करारावर स्वाक्षरी.
  • 27 मे 1935: पत्नी रमाबाई यांचे निधन.
  • 13 ऑक्टोबर 1935: येवला (जि. नाशिक) येथे “मी हिंदू म्हणून जन्मलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही” अशी धर्मांतराची घोषणा.. 
  • 1936-स्वतंत्र मजूर पक्ष या राजकीय पक्षाची स्थापना.
  • 18 जुलै 1942: नागपूर येथे ऑल इंडिया शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशनची स्थापना.
  • 8 जुलै 1945: पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना. 1946: मुंबईत सिद्धार्थ महाविद्यालया ची स्थापना
  • 1946-पश्चिम बंगाल मधून घटना समितीवर निवड.  
  • 29 ऑगस्ट 1947: मसुदा समितीच्या अध्यक्षपदी निवड.. 
  • 1 सप्टेंबर 1950: औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना.
  • 4 मे 1955: भारतीय बौद्ध महासभेची स्थापना.
  • 4 फेब्रुवारी 1956: “प्रबुद्ध भारत” साप्ताहिक सुरू.
  • 14 ऑक्टोबर 1956: नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा. 
  • 6 डिसेंबर 1956: नवी दिल्ली येथे महापरिनिर्वाण.
  • रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही त्यांच्या कल्पनेनुसार निधनानंतर (1957) स्थापन झाली.

वृत्तपत्रे व ग्रंथ

  • वृत्तपत्रे: मूकनायक (1920), बहिष्कृत भारत (1927), समता (1928), जनता (1930), प्रबुद्ध भारत (1956).
  • ग्रंथ: बुद्ध अँड हिज धम्म, थॉट्स ऑन पाकिस्तान, हू वेअर द शूद्राज, कास्ट्स इन इंडिया, ॲनिहिलेशन ऑफ कास्ट (जातिनिर्मूलन), द अनटचेबल्स, रिडल्स इन हिंदुइझम.

कर्मवीर भाऊराव पाटील

  • जन्म 22.09.1887 कुंभोज जि.कोल्हापूर महाराष्ट्र येथे जैन कुटुंबात
  • मागासवर्गीय आणि गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कमवा आणि शिका ही योजना सुरू केली. 
  • 4 ऑक्टोबर 1919: रयत शिक्षण संस्थेची स्थापना (काले, ता. कराड, जि. सातारा). ही महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या शिक्षण संस्थांपैकी एक आहे.
  • 1932-यूनियन बोर्डिंगची स्थापना
  • 1935-महात्मा फुले अध्यापक विद्यालयाची स्थापना.
  • 1959-सरकारने पद्मभूषण पुरस्कार
  • 09.05.1959- देहावसान
  • म. गांधी यांनी कर्मवीर ही पदवी बहाल केली.

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे.

  • जन्म 02.04.1873-कर्नाटक राज्यातील जामसिंडी
  • 18 ऑक्टोबर 1906:अस्पृश्यांच्या कल्याणासाठी मुंबईत डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना.
  • 1917-राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता येथे झालेल्या अधिवेशनात अस्पृश्यता निर्मूलन विषयी ठराव पास
  • देवदासी व मुरळी प्रथा बंद करण्यासाठी आंदोलन; पंढरपूर येथे अनाथाश्रम आणि पुण्यात अहिल्याश्रम सुरू केला.
  • अस्पृश्यतेचा प्रश्न,बहिष्कृत भारत,अनटचेबल इंडिया,माझ्या आठवणी व माझे अनुभव इत्यादी ग्रंथ त्यांनी लिहिली आहेत.
  • 2 जानेवारी 1944: निधन.

गोपाळ गणेश आगरकर

  • जन्म 14.70.1856-टेंभू सातारा
  • 1880-लोकमान्य टिळक व विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या मदतीने न्यू इंग्लिश स्कूलची पुण्यात स्थापना
  • 1881-लोकमान्य टिळक व आगरकर यांनी मिळून मराठा व केसरी हे वृत्तपत्र चालू केले.
  • 1884-लोकमान्य टिळक व गोपाळ गणेश आगरकर यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली.
  • 1888- केसरी वृत्तपत्राच्या संपादकपदाचा राजीनामा देऊन सुधारक हे वृत्तपत्र सुरू केले.
  • सुधारणावादी विचारसरणी न पटल्यामुळे पुण्यातील लोकांनी जिवंतपणी प्रेतयात्रा काढली.
  • ग्रंथ-डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस, विकार विलसित (हॅम्लेट चे भाषांतर)
  • 17.06.1895-निधन

महर्षी धोंडो केशव कर्वे

  • जन्म18.04.1858-शेरवली मुरुड (जि. रत्नागिरी).
  • 1893-विधवा विवाहोत्तेजक मंडळी या संस्थेची स्थापना.गोदाबाई नावाच्या विधवेशी लग्न
  • 1896-पुण्याजवळील हिंगणे येथे विधवा महिला साठी आश्रम स्थापन
  • 1907-महिला विद्यालयाची स्थापना.
  • 1910-निष्काम कर्म मठाची स्थापना.आश्रम आणि शाळा या दोन्ही साठी लागणारे मनुष्यबळ विकसित व्हावे यासाठी या मठाची स्थापना
  • 1916-पुणे येथे पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना .कालांतराने या विद्यापीठाचे नामकरण श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ असे बदलण्यात आले. (SNDT)
  • 1958-जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने भारतरत्न पुरस्कार

पंडिता रमाबाई

  • जन्म: 23 एप्रिल 1858.
  • 1881-पुणे येथे आर्य महिला समाज या संस्थेची स्थापना
  • 1889-अनाथ आणि विधवा स्त्रिया यांच्या राहणे जेवण आणि शिक्षणाच्या मोफत व्यवस्था करण्यासाठी मुंबई येथे शारदा सदन नावाची संस्था आणि पुणे येथे मुक्ती सदन या नावाने स्वतंत्र वसाहत स्थापन
  • हिब्रू भाषेवरून बायबल या ग्रंथाचे मराठी भाषेत रूपांतर
  • 1919-ब्रिटिश सरकारकडून कैसर इ हिंद हा पुरस्कार
  • 5 एप्रिल 1922: निधन.
  • ग्रंथ: स्त्रीधर्मनीती, द हाय कास्ट हिंदू वुमन, युनायटेड स्टेट्सची लोकस्थिती व प्रवासवृत्त..

बाळशास्त्री जांभेकर

  • जन्म -06.01.1812-पोंभुर्ले ता. देवगड.
  • 6 जानेवारी 1832: “दर्पण” हे मराठीतील पहिले साप्ताहिक सुरू केले. म्हणून त्यांना मराठी वृत्तपत्रांचे (पत्रकारितेचे) जनक म्हणतात.
  • 1840: “दिग्दर्शन” हे मराठीतील पहिले मासिक सुरू केले. भाऊ दाजी लाड व दादाभाई नवरोजी हे त्यांचे विद्यार्थी त्यांना मदत करत.
  • बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररी या ग्रंथालयाची स्थापना
  • दर वर्षी 06 जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो.
  • 17.05.1846-मुंबई येथे त्यांचे निधन.

जगन्नाथ शंकर शेट

  • जन्म 10.02.1803-मुरबाड ठाणे
  • 1822-बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना
  • 1848-आपल्या स्वतःच्या घरात मुलाकरिता मुंबईतील पहिली शाळा सुरू
  • 1852-बॉम्बे असोसिएशन या नावाने पहिल्या राजकीय संघटनेची मुंबई येथे स्थापना
  • 1829-बंगाल प्रांतात लागू असलेला सतीप्रथा बंदीचा कायदा मुंबई प्रांतातही लागू करावा यासाठी प्रयत्न
  • 1830-मुंबई प्रांतात सतीप्रथा बंदीचा कायदा लागू
  • ग्रंड झुरी मध्ये हे स्थान मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती
  • 1835-अंश सरकारने मुंबईचे जस्टिस ऑफ पीस म्हणून त्यांची नियुक्ती
  • मुंबईच्या कायदे मंडळाचे सदस्य होण्याचा पहिला मान
  • 1865-जगन्नाथ शंकर शेठ यांचा मृत्यू.

एका नजरेत: संस्था, ग्रंथ व उपाधी

समाज
सुधारक
जन्मप्रमुख संस्था / कार्यग्रंथ / वृत्तपत्रेउपाधी / वैशिष्ट्य
महात्मा फुले11 एप्रिल 1827सत्यशोधक समाज (1873), मुलींची शाळा (1848)गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसूडमहात्मा (1888)
सावित्रीबाई फुले3 जानेवारी 1831पहिल्या महिला शिक्षिका व मुख्याध्यापिकाकाव्यफुले, बावनकशी सुबोध रत्नाकरभारतातील पहिल्या शिक्षिका
शाहू महाराज26 जून 187450 टक्के आरक्षण (1902)–राजर्षी (1919)
डॉ. आंबेडकर14 एप्रिल 1891बहिष्कृत हितकारिणी सभा (1924), शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन (1942)मूकनायक, बहिष्कृत भारत, बुद्ध अँड हिज धम्मराज्यघटनेचे शिल्पकार
भाऊराव पाटील22 सप्टेंबर 1887रयत शिक्षण संस्था (1919)–कर्मवीर, पद्मभूषण (1959)
विठ्ठल रामजी शिंदे23 एप्रिल 1873डिप्रेस्ड क्लासेस मिशन (1906)भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्नमहर्षी
आगरकर14 जुलै 1856डेक्कन एज्युकेशन सोसायटी (1884)सुधारक (वृत्तपत्र), डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवससुधारणावादी विचारवंत
धोंडो केशव कर्वे18 एप्रिल 1858महिला विद्यापीठ (1916), हिंगणे आश्रम (1896)–महर्षी, भारतरत्न (1958)
पंडिता रमाबाई23 एप्रिल 1858आर्य महिला समाज (1882), शारदा सदन (1889)स्त्रीधर्मनीती, द हाय कास्ट हिंदू वुमनकैसर-ए-हिंद (1919)
बाळशास्त्री जांभेकर6 जानेवारी 1812बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररीदर्पण (1832), दिग्दर्शन (1840)मराठी पत्रकारितेचे जनक
जगन्नाथ शंकरशेठ10 फेब्रुवारी 1803बॉम्बे असोसिएशन (1852)–ग्रँड ज्युरीवरील पहिले भारतीय

भारतातील प्रथम व्यक्ति विशेष जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

सराव प्रश्न

  1. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी व केव्हा केली? उत्तर: महात्मा फुले, 24 सप्टेंबर 1873.
  2. “राजर्षी” ही पदवी शाहू महाराजांना कोणी दिली? उत्तर: कानपूर येथील कुर्मी समाजाने, 1919 मध्ये.
  3. “दर्पण” साप्ताहिक कोणी सुरू केले? उत्तर: बाळशास्त्री जांभेकर, 6 जानेवारी 1832.
  4. पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली? उत्तर: धोंडो केशव कर्वे, 1916, पुणे.
  5. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? उत्तर: कर्मवीर भाऊराव पाटील, 4 ऑक्टोबर 1919.
  6. “कैसर-ए-हिंद” पुरस्कार कोणाला मिळाला? उत्तर: पंडिता रमाबाई, 1919.
  7. “मूकनायक” पाक्षिक कोणी सुरू केले? उत्तर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर, 31 जानेवारी 1920.
  8. “डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस” हे पुस्तक कोणाचे? उत्तर: गोपाळ गणेश आगरकर.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

महाराष्ट्रात मुलींची पहिली शाळा कोणी सुरू केली?

महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यातील भिडेवाड्यात.

आरक्षणाचे जनक कोणाला म्हणतात?

? राजर्षी शाहू महाराजांना, कारण त्यांनी 26 जुलै 1902 रोजी मागासवर्गीयांना 50 टक्के आरक्षण जाहीर केले.

मराठी पत्रकारितेचे जनक कोण?

बाळशास्त्री जांभेकर, कारण त्यांनी “दर्पण” हे पहिले मराठी साप्ताहिक सुरू केले.

फुले यांना “महात्मा” पदवी कधी मिळाली?

11 मे 1888 रोजी मुंबईतील कोळीवाडा येथे जनतेकडून.

शेवटचे अपडेट 6 नोव्हेंबर 2026 रोजी करण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

majhishala.in